जळगाव- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मागासवर्गीय कर्मचारी संघटनेने तयार केलेल्या 2024 च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन विद्यापीठाचे कुलगुरू व्ही.एल. माहेश्वरी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांची विशेष उपस्थिती होती.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू यांच्या दालनात सोमवारी कुलगुरू प्रा.डॉ .एल. माहेश्वरी यांच्या हस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी मागासवर्गीय कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष विकास बि-हाडे ,सचिव अरुण सपकाळे ,कार्याध्यक्ष सुभाष पवार ,उपाध्यक्ष नीता शिंदे, सहसचिव विठ्ठल धनगर, कोषाध्यक्ष दीपक गावित ,सदस्य राजू सोनवणे ,जयंत सोनवणे, भीमराव तायडे ,जगदीश सुरळकर, भारत उफाळे आदी उपस्थित होते.
Discussion about this post