मुंबई । जागतिक घडामोडीमुळे भारतीय बाजारात सोने-चांदीच्या किमतीत बदलतात. त्याच प्रमाणे आज सोमवारी सोन्याचा भाव घसरले आहेत. आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोनं स्वस्त झाल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. सोन्याच्या दरात 150 रुपयांची घसरण झाली आहे. तर चांदी 300 रुपये प्रतिकिलो दराने स्वस्त झाली आहे.
आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या दरात 150 रुपयांची घसरण झाली आहे. यामुळे 24 कॅरेट शुद्ध 10 ग्रॅम सोन्यासाठी 63,220 रुपये मोजावे लागत आहेत. 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची सरासरी किंमत 57,950 रुपये होती, तर 18 कॅरेट सोन्याची 47,410 रुपये प्रतितोळा आहे. आज चांदी 300 रुपये प्रतिकिलो दराने स्वस्त झाली आहे. आज एक किलो चांदीचा दर 75,200 रुपये प्रति किलो आहे.
Discussion about this post