जळगाव । आरोग्य क्षेत्रात करिअर करू पाहणाऱ्या तरुणांना नोकरीची चांगली संधी माहाराष्ट्र राज्य सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आली आहे. एकूण ९,७२९ जागांवर ही मेगाभरती होणार आहे. यात पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहे.
वैद्यकीय अधिकारी गट ‘अ’च्या ९,४४६ व बीएएमएस व पदवीधरांच्या २८३ जागा भरण्यात येणार आहेत. १ फेब्रुवारीपासून उमेदवारांकडून अर्ज मागवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. १५ फेब्रुवारीपर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार आहेत. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी http://arogya.mahara shtr.gov.in हे संकेतस्थळ पाहावे तर अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी https://www.morecrument.maha_arogya com हे संकेतस्थळ पाहावे, असे कळवण्यात आले आहे. टपालाने अथवा अन्य मागनि पाठवलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
शैक्षणिक पात्रता
एमबीबीएस, बीएएमएस पदांनुसार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असावी. सार्वजनिक आरोग्य विभागातील विविध पदांसाठी उमेदवारांची निवड ही त्यांच्या अंतिम वर्षांत मिळालेले ९५ टक्के व अनुभव असल्यास अशी आहे त्यासाठीचे ५ टक्के अशा गुणांच्या आधारे मेरिटनुसार ही भरती केली जाणार आहे.
एवढा पगार मिळेल
तसेच निवड झालेल्या उमेदवारांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतनश्रेणी ५६१०० आणि १,७७,५०० रुपये इतके वेतन मिळण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
इतके शुल्क भरावे लागेल
अर्जासाठी असे आहे शुल्क: खुल्या प्रवर्गासाठी १००० रुपये तर मागासवर्गीय, दिव्यांग उमेदवारांना ७०० रुपये अर्ज शुल्क असणार आहे.
दिलेल्या मुदतीत आलेल्या अर्जाचाच स्वीकार केला जाईल, अर्जात कोणत्याही त्रुटी राहणार नाहीत या संदर्भात इच्छुक असलेल्या उमेदवारांनी काळजी घ्यावी असे कळवण्यात आले आहे. त्यामुळे ऑनलाइन पद्धतीने व दिलेल्या सूचनेनुसारच अर्ज करावे. आरोग्य विभागात बऱ्याच दिवसांनी इतक्या मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. युवकांना ही चांगली संधी आहे
Discussion about this post