पाचोरा : पाचोरा तालुक्यातून एक खळबळजनक घटना समोर आली असून येथे महिलेने तिच्या पाच महिन्यांच्या चिमुकल्यासह शेतातील विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. लजिनाबी आरिफ शेख (रा. लासगाव ता. पाचोरा) असे मयत महिलेचे तर असद आरिफ शेख असे मयत चिमुकल्याचे नाव आहे. दरम्यान, महिलेच्या आत्महत्येचे कारण समोर आलेले नसून याबाबत पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अधिक असे की, लासगाव येथील आरिफ शेख यांचा विवाह गावातीलच त्यांची मामाची मुलगी लजिनाबी हिच्याशी झाला होता. लग्नानंतर या दाम्पत्याला पुत्ररत्न प्राप्त होऊन त्याचे नाव असद ठेवण्यात आले. असद व पत्नी तसेच परिवारासह आरिफ शेख हे लासगाव येथे वास्तव्यास होते. २८ मे २०२३ रोजी गावात समाज बांधवातील लग्न असल्याने आरिफ शेख हे पत्नी लजीनाबी, व मुलगा असद यांना सोबत घेऊन लग्नाना गेले. लजीनाबी यांनी पती आरिफ यांना मी थोड्यावेळात परत येते असे सांगितले. व लग्न सोहळ्यातून मुलगा असद याला सोबत घेत निघून गेल्या.
मात्र, लजीनाबी यांनी मुलाचा मृतदेह लासगाव गावातील शेत शिवारातील विहीरीत आढळून आल्याने खळबळ उडाली. लजिनाबी यांनी चिमुकल्यासह विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करीत आहेत. दरम्यान महिलेसह मुलाच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
Discussion about this post