चंदीगड : पंजाबचे राज्यपाल आणि चंदीगडचे प्रशासक बनवारीलाल पुरोहित यांनी आज दुपारी राजीनामा दिला आहे. राजीनामा देण्यासोबतच त्यांनी यामागचे कारण दिले आहे. त्यांनी आपला राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सुपूर्द केला आहे. राष्ट्रपतींना उद्देशून दिलेल्या राजीनामा पत्रात त्यांनी लिहिले आहे की, “वैयक्तिक कारणांमुळे आणि इतर वचनबद्धतेमुळे मी पंजाबचे राज्यपाल आणि चंदीगडच्या केंद्रशासित प्रदेशाचा प्रशासक म्हणून राजीनामा देत आहे.” कृपया ते स्वीकारा.” असं म्हटलं आहे.
अमित शहा यांची भेट घेतली होती
कालच बनवारीलाल पुरोहित यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली होती. पंजाबचे राज्यपाल असण्यासोबतच बनवारीलाल पुरोहित केंद्रशासित प्रदेश चंदीगडचे प्रशासकही राहिले आहेत. काल शुक्रवारी गृहमंत्र्यांच्या कार्यालयाने त्यांच्या आणि अमित शहा यांच्या भेटीची माहिती दिली होती. चंदीगड महापौर निवडणुकीत भाजपच्या विजयानंतर गृहमंत्री अमित शाह आणि बनवारीलाल पुरोहित यांच्यात ही बैठक झाल्याचे सांगण्यात येत आहे. अशा स्थितीत या भेटीबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते.















Discussion about this post