नवी दिल्ली । दर महिन्याच्या पहिल्या तारखेला तेल कंपन्यांकडून एलपीजी सिलिंडर चे दर जाहीर केले जातात. त्यानुसार यावेळी कंपन्यांकडून गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. 1 फेब्रुवारी रोजी 19 किलोच्या सिलेंडरच्या किंमतीत 14 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.
या वाढीनंतर, 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत आता 1,755.5 रुपयांवरून 1,769.50 रुपये प्रति सिलेंडर झाली आहे. मात्र, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. पूर्वीप्रमाणेच हे सिलिंडर याच दराने मिळत राहतील.
व्यावसायिक सिलिंडरच्या दरात वाढ झाल्याने सर्वसामान्यांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. हॉटेल रेस्टॉरंटमधील खाद्यपदार्थ महाग होणार आहेत. म्हणजेच आता तुम्हाला रेस्टॉरंटमध्ये पूर्वीपेक्षा जास्त बिल भरावे लागणार आहे. मात्र, याचा फटका हॉटेल आणि रेस्टॉरंटशी संबंधित लोकांनाच बसणार आहे. घरी बनवलेले अन्न खाणाऱ्यांवर त्याचा काहीही परिणाम होणार नाही. गेल्या तीन महिन्यांत व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत अनेक वेळा वाढ करण्यात आली आहे. सुमारे 6 महिन्यांपूर्वी व्यावसायिक सिलिंडर 120 रुपयांनी स्वस्त करण्यात आले होते. त्यानंतर दर सातत्याने वाढत आहेत.
Discussion about this post