मुंबई : कल्याण डोंबिवली शहरात पुन्हा राजकीय राडा बघायला मिळतोय. येथे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे शहरप्रमुख शरद गायकवाड यांच्यावर गोळीबार केला असून या प्रकारामुळे संपूर्ण राज्यभरात खळबळ उडाली आहे. यात शरद गायकवाड जखमी झाले असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. दरम्यान, या गोळीबार प्रकरणात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाची घोषणा केली आहे.
या प्रकरणाची चौकशी गुन्हे शाखेकडून करण्यात येईल, असा निर्णय फडणवीस यांनी जाहीर केला. आता एसीपी रँकच्या अधिकाऱ्यांकडून पुढील तपास होणार आहे.
यामुळे उल्हासनगर हिल लाईन पोलीस ठाण्याकडून तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. गुन्हे शाखेने लागलीच तपास सुरु केला आहे. या प्रकरणातील तिघं आरोपींना गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. त्यांना दुपारी कोर्टात हजर करण्यात येणार आहे.















Discussion about this post