जळगाव : जळगाव तालुक्यातील डिकसाई येथे एका विवाहितेने डोक्यावर असलेले कर्जाच्या विंवचतेनून विषप्राशन करून आत्महत्या केली. जागृती अरुण कोळी (वय ३२) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
डिकसाई (ता. जळगाव) येथील जागृती कोळी या पती अरुण कोळी व एक मुलगा यांच्यासह डीकसाई येथे वास्तव्यास होत्या. शेती हाच त्यांचे उपजीविकेचे साधन होते. जागृती व अरुण कोळी हे स्वत:ची शेतीसोबतच गावातील इतरांची शेती उक्त्याने घेऊन करत होते. मात्र, यंदा पाऊस कमी झाल्यामुळे शेतीतून उत्पन्न कमी आले. त्यात शेतीसाठी कर्ज घेतल्यामुळे आर्थिक अडचण होती. यामुळे कर्जफेडीची चिंता पती- पत्नी दोघांना लागून होती.
मुलगा घरात असतानाच केले विष प्राशन
दरम्यान २५ जानेवारीला घरात मुलासोबत असताना जागृती कोळी यांनी विषप्राशन केले. यानंतर त्यांना त्रास होऊ लागला. आईला त्रास होत असल्याचे पाहून लहान मुलगा गल्लीत धावत गेला. शेजारच्यांना हा प्रकार लक्षात आल्यानंतर तातडीने जागृती कोळी यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. आठवडाभर उपचार सुरु असताना १ फेब्रुवारीला त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला.
Discussion about this post