धुळे । शिंदखेडा शहरात चोरट्यांनी हैदोस घातला आहे. चोरांच्या टोळक्याने थेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएमवर डल्ला मारला आहे. लाखो रुपये चोरून चोरटे लंपास झाले आहेत. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी येथे धाव घेतली. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. यामध्ये बँक ऑफ इंडिया या बँकेचे एटीएम फोडून जवळपास पाच ते सहा लाख रुपये चोरून चोरट्यांनी पोबारा केला.
रात्रीच्या सुमारास ही चोरी झाली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी शिंदखेडा पोलिसांसह बँकेचे कर्मचारी व अधिकारी घटनास्थळी तात्काळ दाखल झाले आहेत. पोलीस प्रशासनातर्फे विविध तपास यंत्रणांसह या चोरट्यांचा शोध घेतला जात असून, रात्रीच्या गस्ती पथकाला या संदर्भातील माहिती का कळू शकली नाही? असा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित होत आहे.
Discussion about this post