नोकरीच्या शोधात असणारे राज्यातील तरुण-तरुणी पोलिस भरतीची आतुरतेने वाट पाहत असतात. अशा उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. ती म्हणेजच राज्यात तब्बल 17 हजार 471 पदांची पोलीस भरती केली जाणार आहे. आहे. यासाठी वित्त विभागाने मंजुरी दिली आहे. तर इतर विभागांना फक्त 50 टक्के पदांची भरती करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
ही पदे भरली जाणार
पोलीस खात्यात 100 टक्के पदभरतीला मान्यता देण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून पोलीस शिपाई,बॅण्डस्मन, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई व कारागृह शिपाई अशा पदांच्या एकूण 17,471 जागा भरल्या जाणार आहेत.
पोलीस भरती 100 टक्के करण्यास वित्त विभागाची परवानगी
मधल्या काळामध्ये शिंदे-फडणवीस सरकारने पोलिसांची कंत्राटी भरती करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे मुंबईत 3 हजार कंत्राटी पोलिसांची भरती करण्यात येणार होती. या भरती प्रक्रियेत राज्य सुरक्षा महामंडळाच्या जवानांमधून कंत्राटी भरती करण्याचा विचार गृहखात्याने केला होता. या कंत्राटी भरती प्रकरणावरून वाद निर्माण झाल्यानंतर आता वित्त विभागाने पोलीस भरती 100 टक्के करण्यास परवानगी दिली आहे. या पार्श्वभूमीवरच राज्यात तब्बल 17 हजार 471 पदांसाठी मेगाभरती करण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी इथे भेट द्या…
राज्यातील तरुणांना पोलीस भरतीबाबतची सविस्तर माहिती www.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर मिळणार आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचावी; असं आवाहन करण्यात आलं आहे. उमेदवार एकाच घटकात एका पदासाठी एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर करु शकत नाही. उमेदवाराने चुकीची माहिती दिल्यास, उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल; अशा सूचना देण्यात आल्या आहेत.















Discussion about this post