पुणे : आज मे महिन्याचा अखेरचा दिवस. मे महिना संपताच शेतकरी मान्सूनच्या प्रतीक्षेत असतो. आता भारतीय हवामान विभागाने मान्सून संदर्भात चांगली बातमी दिली आहे. मान्सूनने आगेकूच सुरु केली आहे. राज्यात मान्सून लवकरच दाखल होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी तयार राहावे, परंतु पाऊस पडताच लगेच पेरणीची घाई करु नये, मान्सून स्थिरावल्यावर पेरणी करावी.
सध्या राज्यातील काही भागात मान्सूनपूर्व पाऊस झाला असून हा पाऊस म्हणजे वाळवाच्या पावसाला सुरुवात झाल्याचे म्हटले जात आहे. वळवाचा पाऊस मान्सून दाखल होण्यापूर्वी आलेला असतो. यामुळे मान्सूनसाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे.
दोन दिवसांत मान्सूनची आगेकूच केरळकडे होणार आहे. ४ जून रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे. मान्सूनची प्रगतीला कोणताही अडथळा आला नाही तर १० जून रोजी कोकणात दाखल असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
राज्यात 16 जूनपर्यंत मान्सून सर्वत्र दाखल होईल अशी माहिती देखील हवामान खात्याकडून देण्यात आलीय.
दरम्यान मान्सून दाखल झाल्यानंतर शेतकऱ्यांनी लगेच पेरणी करु नये. मान्सून स्थिरावल्यावर पेरणी करावी, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
Discussion about this post