जळगाव । जळगाव शहरातील दाणा बाजार परिसरातून घरफोडी करणाऱ्या दोघा चोरट्यांना जळगाव तालुका पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. जिमाउल्ला खान अलहउल्ला खान (वय- ६०) व सैय्यद अफसर सैय्यद अजगर (वय- २२) असे अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, जळगाव तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हायवे दर्शन कॉलनी व निमखेडी रस्त्यावर घरफोडीच्या दोन घटना झाल्या होत्या. यातील चोरट्यांचा शोध सुरू असताना जिमाउल्ला खान अलहउल्ला खान व सैय्यद अफसर सैय्यद अजगर यांनी ही चोरी केल्याची माहिती व हे दोघे जण शहरात आल्याची माहिती तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महेश शर्मा यांना मिळाली.
त्यांनी सपोनि अनंत अहिरे, पोहेकॉ नरेंद्र पाटील, प्रवीण कोळी, अभिषेक पाटील व इतर कर्मचाऱ्यांना दोघांना ताब्यात घेण्याविषयी सूचना दिल्या. त्यानुसार पथकाने संशयित आरोपी जिमाउल्ला खान अलाहउल्ला खान आणि सय्यद अफसर सय्यद अजगर यांना दाणा बाजार परिसरातून अटक केली आहे. त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केला. पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली















Discussion about this post