पुणे : दहावी, बारावीची बोर्डाची परीक्षा फेब्रवारी, मार्च महिन्यात सुरु होत असून यावर्षांपासून राज्य शिक्षण मंडळाने काही महत्वाचे बदल केले आहेत. हे बदल विद्यार्थ्यांसाठी फायद्याचे ठरणार आहे.
आता बोर्डाने विद्यार्थ्यांना हॉल तिकीट उपलब्ध करुन दिले आहे. दहावीच्या परीक्षेचे हॉल तिकीट उद्यापासून (३१ जानेवारी) विद्यार्थ्यांना मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्चमध्ये होणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठीचे प्रवेश पत्र ऑनलाईन उपलब्ध होणार आहे.
दहावीची प्रात्यक्षिक श्रेणी आणि तोंडी परीक्षा 10 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. तसेच लेखी परीक्षेला 26 मार्चपासून सुरुवात होणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना उद्यापासून हॉल तिकीट देण्यात येणार आहे. या हॉल तिकीटासाठी कुठलेही अतिरिक्त शुल्क घेऊ नये, असे आदेश बोर्डाने विद्यालयांना दिले आहेत.
Discussion about this post