भुसावळ : महिलांसह अल्पवायीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना थांबता थांबत नसून यात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशातच भुसावळच्या 25 वर्षीय माहिलेवर अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला असून याबाबत भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक असे की, भुसावळ शहरातील दर्डा कॉलनी परिसरातील एका भागात २५ वर्षीय महिला ही आपल्या मुलांसह वास्तव्याला आहे. सुरेश त्र्यंबक पाटील रा. कांचन नगर, जळगाव याने महिलेला घर खर्चासाठी, कपडे घेण्यासाठी पैसे देतो आणि मुलांना चांगल्या शाळेत शिकविण्याचे आमिष दाखवत महिलेवर सप्टेंबर २०२३ मध्ये अत्याचार केल्याचा प्रकार घडला आहे.
याबाबत महिलेने रविवारी २८ जानेवारी रोजी रात्री १ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार महिलेच्या तक्रारीवरून संशयित आरोपी सुरेश त्र्यंबक पाटील रा. कांचन नगर, जळगाव याच्या विरोधात भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश बेडकोळी हे करीत आहे.
Discussion about this post