मुंबई । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देशातील भाषांसंदर्भात महत्वाचे विधान केलं. महाराष्ट्रात मराठी सोडून हिंदी ऐकायला येते तेव्हा त्रास होतो. माझा कोणत्याही भाषेला विरोध नाही. परंतु या देशात राष्ट्रभाषेचा निवाडा झालाच नाही. हिंदीही आपली राष्ट्र भाषा नाही. मराठी, तामीळ भाषांप्रमाणे हिंदी उत्तम भाषा, पण ती आपली राष्ट्र भाषा नव्हे असे म्हणत पंतप्रधानांना जर आपल्या गुजरात विषयी प्रमे असेल तर आपण मराठी लोक का मागे आहोत, त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वच शाळांमध्ये १० वी पर्यंत मराठी भाषेची सक्ती करावी अशी मागणी राज ठाकरे यांनी विश्व मराठी संमेलनाच्या मंचावरून केली.
मराठी भाषा सर्वात उत्तम आहे. समृद्ध भाषा आहे. परंतु आज मराठी भाषा घालवण्याचा राजकीय प्रयत्न होत आहे. त्यामुळे माझा संताप होतो. आता कोणीही समोर येऊ द्या, आपण मराठीच बोला. एखादा चांगला विनोद मराठीत होतो तसा कोणत्याही भाषेत होत नाही. तुम्हाला जी भाषा शिकायची ती शिका, पण जिथं राहताय ती भाषा प्रथम शिका. त्यात कसला कमीपणा आला.
राज ठाकरे सरकारी कार्यक्रमात बोलत होते. परंतु त्यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली अन् स्पष्टीकरणही दिले. पंतप्रधान त्यांची भाषा आणि राज्यांबद्दल प्रेम आहे. त्यांना स्वत:चच्या राज्याचे प्रेम लपवता येत नाही. यामुळे जगातील सर्वोच्च पुतळा गुजरातमध्ये झाला. हिऱ्यांचा व्यापार गुजरातमध्ये गेला. गिफ्ट सिटी गुजरातमध्ये होत आहे.
Discussion about this post