मुंबई । आज मराठा आरक्षण आंदोलकांची ऐतिहासिक दिवस ठरला आहे. राज्य सरकारने कुणबी प्रमाणपत्रासंबंधित अध्यादेश आणि राजपत्र जारी केला. ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मनोज जरांगे पाटील यांनी ज्यूस पिऊन उपोषण सोडलं. गेल्या दोन दिवसांपासून त्यांचं उपोषण सुरू होतं. यावेळी गिरीश महाजन, दीपक केसरकर हेही उपस्थित होते.
मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनाचा मनोज जरांगे पाटील यांचा प्रदीर्घ लढा संपला. गेल्या अनेक वर्षांपासून आरक्षणाच्या मागणीसाठी , मराठा समाजासाठी सर्वस्व देणारे मनोज जरांगे पाटील यांच्या पदरात आरक्षण मिळाल्याने त्यांच्या लढ्याला मोठं यश मिळालं. समाजातील सर्वसामान्य व्यक्ती ते मराठा आरक्षणाचे नेते असा मनोज जरांगे पाटील यांचा प्रवास संघर्षमय होता.
गेल्या आठवड्यात अंतरवाली सराटीमधून त्यांनी पायी यात्रा सुरू करत मुंबईच्या दिशेने कूच केले. त्यांच्यासोबत हजारो मराठा बांधव होते. मजल दरमजल करत ते २६ जानेवारील पहाटे वाशीच्या एपीएमसी मार्केटमध्ये आले. तेथे सरकारच्या शिष्ट मंडळाने त्यांच्याशी चर्चा केली. आणि अखेर मध्यरात्रीच्या सुमारासा त्यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या. मागण्या मान्य झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी रात्री दोन वाजता पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी सर्व मागण्या मान्य झाल्या असून त्याचे अध्यादेश निघाल्याचे सांगितले. कुणबी प्रमाणपत्राच्या ज्या नोंदी सापडल्या आहेत, त्यांना प्रमाण पत्र द्यावे तसेच त्यांच्या कुटुंबाना सुद्धा प्रमाणपत्र द्यावे ही मागणी मान्य झाली आहे. तसेच सरकारने सगा सोयराबद्दल अध्यादेश काढले आहे. तो मला देण्यात आल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.
Discussion about this post