नगर । आज देशात प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे मात्र मेथी आणि कोंथिंबीरीला भाव मिळत नसल्याने वैभव शिंदे यांनी रोश व्यक्त केलाय. मेथीचे दर कोसळल्याने अहमदनगरच्या भाजी मार्केटमध्ये शेतकऱ्याला आपली मेथी अक्षरशः रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आली आहे.
वैभव शिंदे यांनी अहमदनगरच्या भाजी मार्केटमध्ये चार हजार मेथीच्या जुड्या आणल्या होत्या. या मेथीला केवळ 50 पैसे जुडीप्रमाणे दर मिळाला आहे. यामध्ये त्यांचे गाडी भाडे देखील निघत नसल्याने त्यांनी मेथी रस्त्यावरती फेकून देत तीव्र संताप व्यक्त केला.
कोथिंबीरीला १ रुपये प्रति जुडी देखील भाव मिळत नसल्याने शेतकरी मोठ्या चिंतेत आहे. त्यामुळे सोलापूरमध्ये देखील कोथिंबीर उत्पादक शेतकऱ्याने वैतागून कोथिंबीर रस्त्यावर फेकून दिली आहे. लागवडीचाही खर्च निघत नसल्याने शेतकऱ्यांना हे पाऊल उचलावं लागतंय. शेत पिकाला हमीभाव द्या अन्यथा गांजा लागवड करण्याची परवानगी सरकारने द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी आक्रमक होत केली आहे.
साल २०२३ मध्ये हवा तसा पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतीवर याचा मोठा परिणाम झाला आहे. अशात हिवाळ्यांच्या दिवसांत काही ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्यात. वारंवार होत असलेलं नुकसान पाहून शेतकरी चिंतेत आहे. त्यात आता मेथी आणि कोथिंबीरीचं पिक जास्त आहे. मात्र त्याला कवडीमोल भाव असल्याने शेतकऱ्यांनी राग व्यक्त केलाय.
Discussion about this post