यावल । पाण्याची मोटरीची पिन लावतांना विजेचा प्रवाह उतरल्याने शॉक लागून ४५ वर्षीय प्रौढाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना यावल तालुक्यातील शिरसाड येथे घडली. गलीराम रामदास धनगर वय ४५वर्ष असं मृताचे नाव असून या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, याबाबत यावल पोलीस ठाण्यात झाली अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक असे की, गलीराम धनगर हे रविवार राहात असलेल्या घरातील पाण्याची मोटर सुरू करण्यासाठी पीन जोडणीस गेले असता मोटारी पिन मध्ये विजेचा प्रवाह उतरल्याने त्या पिन मधून आल्याने त्यांना विजेचा तिव्र धक्का लागला, दरम्यान त्यांना गलीराम धनगर यांना तात्काळ रूग्णवाहिकेतुन उपचारासाठी यावलच्या ग्रामीण रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहीनी भुगवाडया यांनी त्यांना मयत घोषीत केले.
याबाबत मयताचा शालक जितेन्द्र पांडुरंग धनगर (वय ३०, रा. शिरसाड ता.यावल) यांनी यावल पोलीस ठाण्यात खबर दिल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्यासह पोलीस हेड कॉस्टेबल सिकंदर तडवी हे करीत आहे.
Discussion about this post