मुंबई : काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आलेले माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी कन्या डॉ. केतकी पाटीलसह शेकडो कार्यकर्त्यांना घेऊन भाजपामध्ये प्रवेश केला आहे. हा पक्ष प्रवेश सोहळा मुंबईत भाजप पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ना. गिरीश महाजन यांच्यासह अन्य नेत्यांच्या उपस्थित पार पडला. यामुळे जळगावमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
गेल्या दोन दिवसापूर्वी डॉ. उल्हास पाटील, डॉ. वर्षा पाटील व देवेंद्र मराठे यांचे कॉंग्रेसमधून सहा वर्षांसाठी निलंबन करण्यात आले होते. यानंतर डॉ. उल्हासदादा पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन कॉंग्रेसवर टिकास्त्र सोडले होते.
याप्रसंगी त्यांनी स्पष्टपणे आपली कन्या डॉ. केतकी पाटील या भाजपमध्ये प्रवेश करणार असून आपण देखील लवकरच निर्णय घेणार असल्याचे सांगितले होते.
या अनुषंगाने आज मुंबईत प्रवेश सोहळा पार पडला. यात डॉ. उल्हासदादा पाटील, डॉ. केतकीताई पाटील, देवेंद्र मराठे यांच्यासह अन्य मान्यवरांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ना. गिरीश महाजन आदी नेत्यांनी यांचे स्वागत केले. याप्रसंगी आमदार मंगेश चव्हाण, भाजप प्रदेश महामंत्री विजय चौधरी, जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, माजी जि.प. उपाध्यक्ष नंदकुमार महाजन यांच्यासह आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Discussion about this post