जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर ही मोठी संधी तुमच्यासाठी आहे. नवी मुंबई महानगरपालिके अंतर्गत भरती निघाली आहे. विशेष बाब म्हणजे दहावी पास आणि बारावी पास उमेदवार देखील या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज ही करू शकतात.
विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारची परीक्षा देण्याची अजिबातच गरज नाहीये. थेट मुलाखतीमधूनच उमेदवाराची निवड ही केली जाईल. ऑफलाइन पद्धतीने या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करा. तसेच आपल्याला अर्जासोबतच काही कागदपत्रेही जोडणे अत्यंत आवश्यक आहे.
1 फेब्रुवारी 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यापूर्वीच इच्छुकांना या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावी लागणार आहेत उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.
भरली जाणारी पदे :
वैदयकीय अधिकारी 55
स्टाफ नर्स (स्त्री) 49
स्टाफ नर्स (पुरुष) 06
मिळणार पगार :
वैदयकीय अधिकारी Rs.60000 /-
स्टाफ नर्स Rs.20000 /-
असा करा अर्ज
या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला वैद्यकीय अधिकारी, मुख्य इमारत, किल्ले गावठाण जवळ, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई येथे पाठवावा लागणार आहे. या अर्जासोबतच तुम्हाला तुमचा सध्याचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी देखील पाठवावा लागणार आहे. अर्जासोबत दिलेली कागदपत्रे आणि काही माहिती चुकीची असेल तर तुमची अर्ज ही रद्द होऊ शकतात.
जाहिरात पहा : PDF
Discussion about this post