काल सोमवारी अयोध्येत रामलल्ला मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या कार्यक्रमाचा जल्लोष संपूर्ण भारतात साजरा करण्यात आला. दरम्यान, हरियाणामधील भवानी येथे देखील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं सेलिब्रेशन सुरु होतं. यावेळी रामलीला सादर करताना एका कलाकाराचा हार्टअटॅकने मृत्यू झाला आहे.
हरियाणा के भिवानी में आज प्राण प्रतिष्ठा के मौके पर आयोजित रामलीला में 25 साल में हरीश मेहता हनुमान का रोल निभा रहे थे। उन्हें मंच पर ही दिल का दौरा पड़ा और वे गिर गये। लोगों को लगा कि वे एक्टिंग कर रहे हैं। अस्पताल ले गये। लेकिन महज़ 25 साल के हरीश को बचाया नहीं जा सका। pic.twitter.com/0enH0kjdYF
— Bhadohi Wallah (@Mithileshdhar) January 22, 2024
यामध्ये २५ वर्षांचा तरुण हनुमान देवाची भूमिका साकारत होता. अभिनय करताकरता त्याच्या छातीत दुखू लागले आणि त्याला तीव्र हृदयविकाराचा झटका आला. सदर घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तरुण हनुमानाचं पात्र साकारत आहे. सर्व भाविक आनंदाने ही रामलीला पाहत आहेत. तितक्यात हनुमान असलेल्या तरुणाला हार्टअटॅक येतो आणि तो खाली कोसळतो. सुरुवातीला उपस्थितांना तो नाटक करत असावा असं वाटतं.
मात्र बराचवेळ तो जागेवर पडून राहतो. त्यानंतर सर्वजण त्याला उठवण्याचा प्रयत्न करतात. त्याची तब्येत पाहून उपस्थितांनी त्याला रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टर सांगतात. ही माहिती मिळताच तिथे उपस्थित सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकते.
Discussion about this post