जळगाव । स्वराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी खासदार संभाजीराजे छत्रपती हे रविवारी जळगावात आले होते. एका माध्यमाच्या वधार्पनदिनानिमित्ताने त्यांच्या प्रकटमुलाखतीच्या कार्यक्रमासाठी ते उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान, नव्या संसदभवन सोहळ्यावर संभाजीराजेंनी टोला लगावला आहे.
रविवारी नव्या संसंदभवनाचे पंतप्रधान मोदी यांनी उद्घाटन केले. मात्र त्यांच्यासोबत राष्ट्रपती असते तर याची गरिमा वाढली असती, असा टोला माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी भाजपला लगावला आहे.
तसेच यावेळी त्यांनी गौतमी पाटील आणि तिच्या आडनावावरून सुरू असलेल्या वादासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त केली. छत्रपती शिवाजी महाराज यांनी महिलांना संरक्षण दिलं. त्यामुळेच महिलांनाही स्वातंत्र्य आहे. महाराष्ट्र हे वेगळं राज्य त्यामुळे सर्वांनी गौतमी पाटील यांच्यामागे उभं राहिलं पाहिजे. कलाकाराला संरक्षण मिळालंच पाहिजे मी याच मताचा आहे असं संभाजीराजेंनी म्हटलं आहे.
इतर राज्यांमध्ये जातीवर राजकारण चालतं. जाती विषमता कमी करायची असेल तर बहुजन समाजाच्या लोकांना न्याय दिला गेला पाहिजे. सध्या खालच्या पातळीचं राजकारण सुरु आहे. अशा राजकारणाला लोक कंटाळले आहेत. खोके-बोके, मांजर-कुत्रे ही भाषा ऐकण्यापेक्षा सुसंस्कृत महाराष्ट्र कसा घडावा? याविषयीची अपेक्षा लोक करत आहेत.
Discussion about this post