मुंबई । राज्यातील बहुतांश ठिकाणी थंडीमुळं हुडहुडी भरत असल्याचं चित्र दिसत असून राज्यातील 11 जिल्ह्यात 23 जानेवारी पर्यंत थंडी जाणवणार असल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली. पहाटेचे किमान तापमान हे 10 ते 12 डिग्री से.ग्रेड तर दुपारचे कमाल तापमान 26 डिग्री से. ग्रेड म्हणजे ही दोन्हीही तापमान सरासरी इतके तर काही भागात सरासरीपेक्षा एखाद्या डिग्रीने कमी दरम्यानचे असू शकते.
या भागात जाणवणार थंडी :
मुंबईसह कोकण आणि विदर्भ वगळता महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, उत्तर सातारा तसेच छत्रपती संभाजीनगर, जालन्यात थंडी जाणवणार आहे.
माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईसह कोकणात सध्या 19 ते 23 जानेवारी पर्यंत पुढील४ दिवसात पहाटेचे किमान तापमान हे 14 डिग्री से.ग्रेड तर दुपारचे कमाल तापमान 26 डिग्री से. ग्रेड म्हणजे ही दोन्हीही तापमाने सरासरी इतके तर काही भागात सरासरीपेक्षा एखाद्या डिग्रीने कमी दरम्यानचे असु शकतात. दक्षिण कोकणात कमाल तापमान वाढ ही एखाद्या डिग्रीने अधिक असेल अशी माहिती माणिकराव खुळे यांनी दिली.
विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात सध्या 19 ते 23 जानेवारी पर्यन्तच्या पुढील 5 दिवसात पहाटेचे किमान तापमान हे 14 ते 16 डिग्री से.ग्रेड तर दुपारचे कमाल तापमान 28 डिग्री से. ग्रेड म्हणजे ही दोन्हीही तापमाने सरासरी इतके तर काही भागात सरासरीपेक्षा एखाद्या डिग्रीने अधिक दरम्यानचे असु शकतात. विदर्भात 23 जानेवारीनंतर 3 दिवसासाठी म्हणजे 25 जानेवारी पर्यंत ढगाळ वातावरण राहून थंडी काहीशी कमी होईल. अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते, अन्यथा नाही.
Discussion about this post