मुक्ताईनगर : नांदेड जिल्ह्यातील रोही पिंपळगाव (ता. मुदखेड) येथे एका सहा वर्षीय चिमुकलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करून निर्घृण हत्या करण्यात आली. या संतापजनक घटनेमुळे शाहू, फुले आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्राची प्रतिमा खालावली आहे.
दरम्यान, घटनेची युद्धस्तरावरून चौकशी करून दोषी आरोपींना तत्काळ अटक करावी, फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला चालवून दोषींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी केली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा प्रांजली रावणगावकर या घटनेचा पाठपुरावा करीत आहेत. त्यांनी त्या दुर्दैवी बालिकेच्या माता-पित्यांची भेट घेऊन संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांचेसोबत असल्याची ग्वाही दिली आहे. या मुलीला न्याय मिळेपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही, असे रोहिणी खडसे यांनी सांगितले.
Discussion about this post