नवी दिल्ली : केंद्र सरकारने अयोध्येतील राम मंदिरात 22 जानेवारीला होत असलेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे.
केंद्र सरकारने सर्व केंद्र सरकारी कार्यालये, केंद्रीय संस्था आणि केंद्रीय औद्योगिक येथे अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. 22 जानेवारी 2024 रोजी दुपारी 2:30 वाजेपर्यंत आस्थापनेला सुट्टी असेल.
रामललाचा अभिषेक 22 जानेवारीला अयोध्येत होणार असून देशभरात याचा उत्साह आहे. उत्तर प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश या राज्यांनी यानिमित्त आधीच सुट्टी जाहीर केली आहे. आता केंद्र सरकारनेही सर्व कार्यालये आणि संस्थांना अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. लोकांना प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहता यावे यासाठी ही अर्धा दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
22 जानेवारी रोजी दुपारी 12.30 वाजता रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या दिवशी काही सेकंदाचा शुभ मुहूर्त असणार आहे
Discussion about this post