नवी दिल्ली । येत्या 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात प्रभू रामाचा अभिषेक होणार आहे. पण याआधी राम मंदिर आणि अयोध्या संदर्भात लाखो पोस्ट इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. यापैकी बहुतेक दिशाभूल करणारे आणि बनावट निघाले आहेत. अशीच आणखी एक पोस्ट समोर आली आहे. आता राम मंदिराची प्रिंट असलेली 500 रुपयांची नोट सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. तुम्ही अशी नोट पाहिली आहे का? आरबीआयनं खरोखरच राम मंदिराचा फोटो असलेली 500 रुपयांची नोट जारी केली आहे का, हे जाणून घेवू या.
प्रभु रामाच्या चित्रासह व्हायरल होत असलेल्या 500 रुपयांच्या नोटांचे छायाचित्र बनावट असल्याचं आढळून आलंय. नोटांवरील महात्मा गांधींचं चित्र बदलण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. महात्मा गांधी यांच्याऐवजी श्रीराम आणि धनुष्यबाण असलेली अशा प्रकारची कोणतीही नोट बाजारात येणार नसल्याची माहिती नोट प्रेसच्या सूत्रांनी दिलीय.
सध्या सोशल मीडियावर पाचशे रुपयांच्या नव्या नोटेची चर्चा होतेय. पाचशे रुपयांच्या नोटेची छायाचित्रं देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या पाचशे रुपयांच्या नव्या नोटेवर श्रीराम आणि धनुष्यबाणाचं चित्र असलेला व्हिडिओ व्हायरल होतो. २२ जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नवी नोट जारी होणार असल्याची चर्चा देखील सोशल मीडियावर होतेय.
बनावट नोटांना बळी पडू नये
आरबीआयच्या वेबसाईटवर बँकेच्या नोटांमध्ये करण्यात येणार्या बदलांबाबत अशी कोणतीही माहिती आढळलेली (fake note) नाही. आरबीआयने याची कोणतीही पुष्टी केलेली नाही. आरबीआयच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, सध्याच्या 2000 रुपयांची नवीन मालिका 500, 200, 100, 50, 20 आणि 10 रुपयांच्या नोटांवर महात्मा गांधींचं चित्र असणार आहे. त्यामुळे नागरिकांनी अशा बनावट नोटांना बळी पडू नये.
एकीकडे ही नोट व्हायरल होत आहे, मात्र रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून प्रभू श्री रामाचे चित्र असलेल्या ५०० रुपयांच्या नव्या नोटांच्या मालिकेबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भगवान श्रीरामाच्या फोटोसह व्हायरल होत असलेली 500 रुपयांची नोट बनावट
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जागी आणखी काही चित्रासह 500 रुपयांच्या नव्या नोटांची मालिका जारी करण्याची ही पहिलीच वेळ नाही. जून २०२२ मध्ये, आरबीआय सध्याच्या चलनात आणि बँक नोटांमध्ये महात्मा गांधींचे चित्र बदलून रवींद्रनाथ टागोर आणि माजी राष्ट्रपती एपीजे कलाम यांच्या चित्रांसह नोटांची नवीन मालिका छापण्याचा विचार करत आहे, असं वृत्त आलं होतं. त्यानंतर या वृत्ताचे खंडन करण्यासाठी आरबीआयला पुढे यावे लागले. तेव्हाही आरबीआयने असा कोणताही प्रस्ताव आरबीआयसमोर नसल्याचे सांगितले होते.
Discussion about this post