चाळीसगाव । चाळीसगाव शहरात शिवपुराण कथेनिमित्त बंदोबस्तासाठी आलेल्या जळगावातील होमगार्ड सैय्यद हाफिज सैय्यद रऊफ यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. कर्तव्यावरच होमगार्डचा अकाली मृत्यू ओढवल्याने पोलिस दलातून हळहळ व्यक्त करण्यात आली.
चाळीसगाव शहरात पं.प्रदीप मिश्रा यांच्या कथेचे 16 पासून आयोजन करण्यात आले आहे. वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणावर पोलिस व होमगार्ड कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहे. बुधवारी सायंकाळी सव्वा पाच वाजता सैय्यद हाफिज हे बसस्थानकासमोर शहर वाहतूक शाखेचे मुकेश बिर्हाडे, हवालदार अजय पाटील यांच्यासोबत कर्तव्यावर असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागले व त्यांच्या तोंडातून फेस येवू लागताच सोबतच्या सहकार्यांनी त्यांना तत्काळ रीक्षातून चाळीसगावच्या श्री समर्थ रुग्णालयात हलवले मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू ओढवला.
याप्रकरणी कॉन्स्टेबल मुकेश बिर्हाडे यांच्या खबरीनुसार चाळीसगाव शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.
Discussion about this post