रत्नागिरी | शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का बसला आहे. शिवसेना उपनेते आणि आमदार डॉ. राजन साळवी यांच्या निवासस्थानी आणि हॉटेलवर रत्नागिरी आणि रायगड येथील एसीबीचे पथक पोहचले. अधिकाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची चौकशी सुरु केली आहे.
राजन साळवी यांच्या जुन्या घरी, सध्या राहत असलेल्या घरी, हॉटेलमध्ये एसीबीचे अधिकारी सकाळी दहा वाजता पोहचले आहे. एसीबीचे १८ ते २० अधिकारी आले आहे. त्यांना मुख्यमंत्री कार्यालयाकडून आदेश आले होते. त्यानंतर त्यांनी चौकशी सुरु केली. घरातील एका सदस्याने सांगितले की, यापूर्वी घरी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आले होते. ते घराचे मोजमाप करुन गेले. आता एसीबीचे अधिकारी आले आहेत.
एसीबीच्या अधिकाऱ्यांनी घरात कपडे किती आहे, भांडी किती आहे, कागदपत्रांची तपासणी करत आहेत, असे घरातील सदस्याने सांगितले. यापूर्वी अधिकाऱ्यांनी चौकशीला बोलवले होते. आम्ही सहकार्य केले. यामुळे चौकशी संपली असे आम्हाला वाटले होते. परंतु विरोधकांना संपवणे हे काम सध्याच्या सरकारने सुरु केले आहे. राजन साळवी दुसऱ्या ठिकाणी देवदर्शनासाठी गेले आहेत. ते चौकशीला सहकार्य करणार आहे.
Discussion about this post