धुळे । लाचखोरीला आळा घालण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. मात्र लाचखोरांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. अशातच धुळ्यातून लाचखोरीचा प्रकार समोर आला आहे. अपघातग्रस्त वाहन सोडून देण्यासाठी हवालदारामार्फत पाच हजारांची लाच घेताना धुळ्यातील देवपूर पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षकाला धुळे एसीबीने अटक केली. या कारवाईने धुळे जिल्हा पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.हरीश्चंद्र पाटील असे अटकेतील पोलिस उपनिरीक्षकाचे तर रवींद्र मोराणीस असे अटकेतील पोलिस हवालदाराचे नाव आहे.
35 वर्षीय तक्रारदार यांचे शेतीमाल वाहतुकीचे ट्रॅक्टर देवपूर पोलिस स्टेशन हद्दीत मुंबई आग्रा महामार्गावर अपघातग्रस्त झाले. या घटनेबाबत मोटर अपघात दाखल करून अपघातग्रस्त वाहन सोडून देण्यासाठी लाचखोर फौजदारासह हवालदाराने बुधवार, 17 जानेवारी रोजी पाच हजारांची लाच मागितली. तक्रारदाराने तक्रार नोंदवल्यानंतर लाचेची पडताळणी करण्यात आली व लाच स्वीकारताच दोघांना अटक करण्यात आली.
हा सापळा धुळे एसीबीचे पोलिस उपअधीक्षक अभिषेक पाटील, पोलिस निरीक्षक रुपाली खांडवी, हवालदार राजन कदम, मुकेश अहिरे, प्रवीण मोरे, संतोष पावरा, रामदास बारेला, प्रशांत बागुल, मकरंद पाटील, प्रवीण पाटील, पोहवा चालक सुधीर मोरे, जगदीश बडगुजर आदींच्या पथकाने यशस्वी केला.
Discussion about this post