नवी दिल्ली : एकीकडे लोकसभा निवडणुकीची लगबग आणि दुसरीकडे राज्यसभेतून वर्षात तब्बल 68 राज्यभसा खासदारांचा कार्यकाळ संपणार आहे. यामध्ये 9 केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे. राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या एकूण खासदारांपैकी सर्वाधिक खासदार भाजपचे आहेत.
राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या एकूण खासदारांमध्ये महाराष्ट्रातील सहा खासदारांचा समावेश आहे. यामध्ये माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय मंत्री नारायण राणे, कुमार केतकर, अनिल देसाई, श्री. व्ही. मुरलीधरन आणि राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण यांचा समावेश आहे. त्यामुळे आता राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या या खासदारांना पुन्हा राज्यसभेवर जाण्याची संधी मिळणार का? सध्या मोदी सरकारमध्ये सूक्ष्म लघुउद्योग खात्याची धुरा सांभाळणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं काय होणार? त्यांची राज्यसभेवर पुन्हा वर्णी लागणार की, पक्षाकडून लोकसभेचं तिकीट त्यांना मिळणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.
महाराष्ट्रातून 2024 मध्ये कोणते खासदार निवृत्त होणार?
माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार प्रकाश जावडेकर
केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार नारायण राणे
काँग्रेसचे खासदार कुमार केतकर
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई
भाजपचे खासदार श्री. व्ही. मुरलीधरन
राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण
Discussion about this post