जळगाव । गिरीश महाजन यांनी माझ्या मागे ‘ईडी’लावली म्हणून त्यांच्यामागे मोक्का लागला असं राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे म्हणाले होते. आता यावर गिरीश महाजन यांनी जोरदार पलटवार केला आहे.
एकनाथ खडसेंचं डोकं तपासायला लागणार आहे. एकनाथ खडसेंच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. सतत ईडी मोक्का लावला. हे लावलं, ते लावलं. आपला जावई जेलमध्ये अडकून आहे. ते आधी पाहा, “तुम्ही माझ्यामागे मोका लावून चांगलं काम केलं,” असं महाजन म्हणाले.
मी तर खडसेंवर कुठलेही आरोप केलेले नाहीत, जे आरोप केले आहेत ते अंजली दमानिया यांनी केलेले आहेत म्हणूनच तुमची चौकशी झालेली आहे असही ते म्हणले.एकनाथ खडसेंना कोर्टाने एवढं ठोकलं की हा माणूस किती चोर आहे हे दाखवून दिलं,असंही गिरीश महाजन म्हणालेत.
तुमचा जावई हा गरीब माणूस आहे तो तुमच्या स्वार्थपणामुळे दोन-तीन वर्षापासून जेलमध्ये आहे, त्यांना जामीन मिळत नाही. आपलं कुटुंबीय कोर्टाने थांबवलं म्हणून सध्या बाहेर आहेत, त्याची कल्पना तुम्हाला आहे. म्हणून तुम्ही माझ्यावर तो मोका लावला तो कसा लावला त्याची कल्पना मला आहे. तुमच्या मागे ईडी लागली आहे, हे सर्व लोक बघत आहेत.
Discussion about this post