पुणे : महाराष्ट्र बोर्डाने २५ मे रोजी १२वी परीक्षेचा निकाल जाहीर केला. त्यानंतर १०वी निकालाची विद्यार्थी पालक मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहे. मात्र आता निकालाबाबत एक मोठी अपडेट समोर आलीय. लवकरच दहावीचा निकाल लागणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून 10वीची परीक्षा 2 मार्च ते 25 मार्च दरम्यान घेण्यात आली होती. त्याच वेळी, 12वीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 21 मार्च 2023 या कालावधीत झाली. 12वीचा निकाल 25 मे रोजी बोर्डाने जाहीर केला. त्यानंतर दहावीचा निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थी आतुरतेने वाट पाहत असून जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात म्हणजे 7 जून 2023 पर्यंत दहावीचा निकाल लागण्याची शक्यता आहे.
मात्र महाराष्ट्र राज्य बोर्डाकडून या संदर्भात अधिकारीक घोषणा करण्यात आलेली नाही.अशा परिस्थितीत निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना निकाल कुठे पाहता येऊ शकतो? या संदर्भात आता आपण जाणून घेऊया.
mahresult.nic.in आणि mahahsscboard.in या संकेतस्थळावर विद्यार्थी आपला निकाल पाहू शकणार आहेत. निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम वर नमूद केलेल्या संकेतस्थळापैकी कोणत्याही एका संकेतस्थळाला विद्यार्थ्यांना भेट द्यावी लागेल. संकेतस्थळावर गेल्यानंतर त्या ठिकाणी एसएससी रिझल्ट 2023 असा पर्याय दिसेल. यावर क्लिक करायचे आहे.
Discussion about this post