चाळीसगाव | चोरीच्या पाईपासह इतर मालाची चोरी करून मेहूणबारेकडून-चाळीसगावकडे येणाऱ्या छोटा हत्तीला शहर पोलिसांनी पकडले. यावेळी २ लाख २० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे. अशोक विश्वनाथ पवार (वय-२७) (चालक), वाल्मीक साहेबराव सोनवणे (वय-४५), राहुल रावसाहेब पाटील (वय-३१), रविंद्र नागो राजपुत (वय-५२), रोशन युवराज मोरे (वय-२३) असे अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, काल रात्री पोलीस निरीक्षक संदिप पाटील यांनी रात्रीच्या वेळी गस्त दरम्यान संशयीत वाहने चेक व खात्री करुन कारवाई करणेकामी सुचना दिलेल्या होत्या. यानुसार पथक तयार करण्यात आले. त्याप्रमाणे सदर पथक गस्त करत असतांना पोलीस नाईक दिपक पाटील यांना रात्री ३:४५ वाजेच्या सुमारास धुळे रोडवरील डेराबर्डी परिसरात असलेल्या साने गुरुजी शाळेसमोर रोडवर मेहुणबारे गावाकडुन चाळीसगाव शहराकडे एक टाटा एस (छोटा हत्ती) वाहन भरधाव वेगाने येतांना दिसले.
तेव्हा सदर वाहन चालकास त्यांनी थांबविण्याचा इशारा केला. परंतु चालकाने त्याचे ताब्यातील टाटा एस ( छोटा हत्ती) वाहन न थांबविता भरधाव वेगाने चाळीसगाव शहराकडे चालवित नेले. तेव्हा पोलीस पथकाचा त्या वाहनावर अधिक संशय बळावल्याने त्यांनी वाहनाचा पाठलाग करत पोलिसांनी पुन्शी पेट्रोल पंपाच्यापुढे थांबविले. त्या वाहनामध्ये मागे तीन ईसम बसलेले होते. त्यांनी पोलीसांना पाहताच त्यापैकी दोन इसम अंधाराचा फायदा घेवुन वाहनातुन उतरुन पळुन गेले. तसेच वाहन चालक आणि त्याच्या शेजारी तीन इसम बसलेले होते. पोलीस पथकाने वाहनाची तपासणी केली असता त्या वाहनात शहरात जल पुरवठा वाहिनीसाठी वापरण्यात येणारे, लोखंड मिश्रीत बिड धातुचा एक पाईप तसेच त्या पाईपाचे तुकडे दिसले.
यावेळी पोलीस पथकाने त्यांना सदर पाईप कोठुन आणले याबाबत व पळुन गेलेल्या इसमांबाबत विचारपुस केली असता त्यांच्याकडून उडवा-उडवीचे उत्तरे मिळाली. तेव्हा सदर पथकातील कर्मचारी यांना सदर पाईप हा कोठूनतरी चोरी करून आणले असल्याचे खात्री झाल्याने सदर इसमांना वाहनासह ताब्यात घेवून चाळीसगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास पोना दिपक पाटील, पोशि अमोल भोसले करीत आहे.















Discussion about this post