धरणगाव । धरणगाव कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी शिवसेनेच्या लताबाई गजानन पाटील तर उपसभापतीपदी भाजपचे संजय जुलाल पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे. दुसऱ्यांदा महिलेला संधी व शिवसेनेच्या पहिल्यांदा महिला सभापती झाल्याने अभिनंदन करण्यात आले. यावेळी सभापती व उपसभापती यांचे स्वागत शिवसेनेचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, राष्ट्रवादीचे संजय पवार, भाजपाचे पी.सी.पाटील यांनी केले.
धरणगाव कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडीसाठी नूतन संचालकांची विशेष सभा सहाय्यक निबंध विशाल ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.यावेळी दोघांचे एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांची निवड घोषित करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांच्या आग्रहानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील ढोल-ताशाच्या गजरावर ठेका धरला. तसेच भाजप-शिवसेना आणि संजय पवार यांच्या गटातला प्रत्येकी एक-एक वर्ष सभापती आणि उपसभापतीपद दिले जाणार असल्याचे ना. पाटील यांनी सांगितले.
ठाकरे शिवसेना व राष्ट्रवादीच्या निवडणुकीवर बहिष्कार बाजार समितीच्या सभागृहात विशेष सभेत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना व राष्ट्रवादीचे संचालक उपस्थित होते त्यात सुरेश नाना चौधरी, रमेश माणिक पाटील, रघुनाथ धुडकू पाटील, रंगराव दोधु पाटील, रवींद्र भिलाजी पाटील, दिलीप उत्तम धनगर हे, सहा सदस्य सह्याकरून सभापती उपसभापती निवडणुकीपासून तटस्थ राहिले. यावेळेस बोलताना रमेश पाटील म्हणाले की, सभापती उपसभापती निवडणुकीवर आम्ही बहिष्कार टाकला आहे निवडणूक अधिकारी यांनी घोळ केला होता. आमच्या एक उमेदवार तीन मतांनी पराभूत झाला आम्ही रिकाऊंटिंगची मागणी केली होती. पण ती त्यांनी स्वीकारली नाही फेर मोजणी करावी परंतु आमच्यावर अन्याय झाला लोकशाहीच्या आघात आहे. म्हणून आम्ही बहिष्कार टाकला होता.
Discussion about this post