जळगाव : शहरातील अजिंठा चौकातील मोठ्या कब्रस्तानात एक दिवसापूर्वी पुरलेल्या नवजाताचा मृतदेह लांबवल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली. मोकाट कुत्र्यांनी तीन फूट कबर उकरून हा मृतदेह लांबवल्याचा संशय आहे. याबाबत मयत मुलाच्या पित्याने एमआयडीसी पोलिसांत धाव घेतली. मात्र पोलिसांनी कुणाला आरोपी करावे, या कारणास्तव तक्रार घेतली नसल्याचे पित्याचे म्हणणे असून लेखी अर्ज घेवुन आम्ही तपास करू असे पोलिसांनी सांगितल्याचे मयत नवजाताच्या पित्याने सांगितले.
जळगाव शहरातील अजिंठा चौकाजवळील मुस्लीम कब्रस्तानात शेख करीम यांच्या कुटुंबीयांनी नवजात बाळाचा मृतदेह शनिवार (ता.३०) रोजी पुरला हेाता. धर्म प्रथेप्रमाणे आज सकाळी करीम शेख यांच्या कुटुंबासह कब्रस्तानात धार्मिक विधीसाठी गेले असता त्यांना अवघ्या अठरा तासांपूर्वी अंत्यविधी केलेली कबर उकरलेली दिसल्यावर ते आक्रोश करू लागले.
चौकशी केल्यावर त्यांना कुठलेही समाधानकारक उत्तर न मिळाल्याने त्यांनी थेट एमआयडीसी पोलिस ठाणे गाठत मृतदेहाचा शोध घ्यावा. तसेच दोषींवर कारवाई व्हावी, यासाठी तक्रार देण्यास विनंती केली. मात्र, एमआयडीसी पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिल्याचे त्यांनी सांगितले.















Discussion about this post