प्रदीर्घ कालावधीच्या प्रतीक्षेनंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्राध्यापकांच्या रिक्त जागांवर भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. एकूण 111 जागांसाठी ही भरती राबविली जाणार असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. 1 जानेवारी 2024 रोजी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ जानेवारीपर्यत आहे.
उच्च व तंत्रशिक्षण विभागाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात रिक्त असलेल्या २१५ पैकी १११ रिक्त पदे भरण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यानुसार ही पदे भरण्यासाठी आवश्यक असणारी जाहिरात पुणे विद्यापीठाकडून शनिवारी प्रकाशित करण्यात आली आहे.
रिक्त पदांचा तपशील :
यामध्ये प्रोफेसर पदाच्या 32 जागा, असोसिएट प्रोफेसर पदाच्या 32 जागा आणि असिस्टंट प्रोफेसर पदाच्या 47 जागा भरल्या जाणार आहेत
असिस्टंट प्रोफेसर पदासाठी 47 जागा उपलब्ध असल्या तरी त्यातील १५ जागा खुल्या प्रवर्गासाठी , 15 जागा ओबीसी संवर्गासाठी , ५ जागा ईडब्ल्यूएस संवर्गासाठी, ४ जागा एसटी संवर्गासाठी, ३ जागा डी.टी-ए संवर्गासाठी, 2 जागा एन टी-सी संवर्गासाठी तर प्रत्येकी 1 जागा एससी, एनटीसी आणि एसबीसी संवर्गासाठी आहे.
पात्रता : पदांनुसार पात्रता वेगवेगळी आहे. कृपया यासाठी जाहिरात वाचावी
जाहिरात पहा : PDF
अर्ज शुल्क :
खुल्या संवर्गातील उमेदवारांकडून अर्जासाठी 1 हजार रुपये तर आरक्षित संवर्गासाठी 500 रुपये ऑनलाइन शुल्क आकारले जाणार आहेत.
अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ : recruitment.unipune.ac.in















Discussion about this post