जळगाव /मुंबई : केंद्र सरकारने हिट अँड रन कायद्यात बदल केल्यानंतर देशभरातील ट्रकचालक आक्रमक झाले असून राज्यातील टँकर चालकांनी तीन दिवसीय संप पुकारला आहे. संपाच्या दुसऱ्या दिवशी राज्यात अनेक ठिकाणी पेट्रोल-डिझेलची टंचाई निर्माण झाली आहे.
जळगावसह राज्यातील अनेक ठिकाणी संपाची बातमी कळताच मध्यरात्रीपासून पेट्रोल पंपावर पेट्रोल, डिझेल भरण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. आज सकाळी अनेक पेट्रोलपंपावर नो स्टॉकचे बॅनर फळ्या लागल्या.
त्याचवेळी संपामध्ये फूट पडली आहे. राज्यात विदर्भ आणि कोल्हापूरमधील ट्रक चालकांनी संप मागे घेतला आहे. परंतु राज्यातील इतर ठिकाणी संप सुरुच आहे.















Discussion about this post