तुम्हीही सरकारी नोकरी शोधात असाल तर तुमच्यासाठी ही मोठी संधी ठरू शकते. जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये मोठी भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. या विभागामध्ये स्केल एक ऑफिसर पदासाठी तब्बल 85 जागा भरण्यात येणार आहेत. तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर तुम्ही तुमचा अर्ज जीआयसीच्या gicre.in या अधिकृत वेबसाईटवरून भरू शकता. 23 डिसेंबरपासून या पदांसाठी अर्ज स्विकारण्यास सुरुवात झाली आहे. तुम्ही तुमचा अर्ज 12 जानेवारी 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीनं भरू शकता.
या पदांसाठी होणार भरती
हिंदी, 1 पद
जनरल, 16 पदं
सांख्यिकी, 6 पदं
अर्थशास्त्र, 2 पदं
कायदेविषयक, 7 पदं
एचआर, 6 पद
अभियांत्रिकी, 11 पदं
आयटी, 9 पदं
विमासंदर्भात पदं, 21
मेडिकल, 2 पदं
हाइड्रोलॉजिस्ट, 1 पदं
कृषी – एक पद
आणि समुद्र विज्ञान 1 पद
शैक्षणिक पात्रता: 60% गुणांसह हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी/कोणत्याही शाखेतील पदवी/LLB/ B.E/B.Tech [SC/ST: 55% गुण]
वयाची अट: 01 ऑक्टोबर 2023 रोजी 21 ते 30 वर्षे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: Gen/OBC: ₹1000/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 जानेवारी 2024















Discussion about this post