चाळीसगाव । येथील विद्रोही मराठी साहित्य संमेलन संयोजन समिती वतीने छत्रपती शिवाजी महाराज व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, क्रांती जोतीराव फुले यांना अभिवादन करून” एक मूठ धान्य एक रुपया विद्रोहासाठी!” या अभियानाची सुरुवात करण्यात आली. अमळनेर येथे 03 आणि 04 फेब्रुवारी 2024 रोजी होणाऱ्या विद्रोही मराठी साहित्य संमेलन साठी शासकीय विश्रामगृह चाळीसगाव येथे साने गुरुजी यांच्या पवित्र असलेल्या कर्मभूमी मध्ये होणाऱ्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती.
साने गुरुजींना मानवतावादी संदेश समर्पित आहे. विद्रोही संमेलनात सर्वसामान्य व ग्रामीण भागातील नागरिकाचा ही सहभाग असावा या उद्देशाने “एक मूठ धान्य एक रुपया विद्रोहासाठी ” या अभियानाची सुरुवात चाळीसगाव येथील शासकीय विश्रामगृहात करण्यात आली. विद्रोही मराठी साहित्य संमेलन का? व कशा साठी याबाबत माहिती साहित्यिक सुनील गायकवाड यांनी सांगितली, तर प्रास्ताविक गोकुळ पाटील यांनी केले.
सूत्रसंचालन चंद्रकांत ठाकरे यांनी केले. प्रा. गौतम निकम यांनी अध्यक्षीय भाषण केले.जिल्हा परिषद सदस्य तथा दूध संघाचे सदस्य प्रमोद बापू पाटील यांनी विद्रोही साहित्य संमेलन जनजागरण गावागावात घ्या असे आवाहन केले. बैठकीस नगरसेवक रामचंद भाऊ जाधव, योगेश राजधर पाटील, मुकेश नेतकर,प्रा. विजय शिरसाट , प्रा कल्पतेश देशमुख,सागर नागणे , प्रा. शिवाजी साळुंखे, राहुल मोरे,किशोर गवळी यांची उपस्थिती होती. कवी गौतमकुमार निकम, सुनील गायकवाड, गणेश निकम,शाहीर वाल्मीक फाजगे, यांनी विद्रोही साहित्य संमेलनावर एक गीत सादर करून बैठकीची सांगता केली.