लातूर महानगरपालिकेत नुकतीच एक बंपर भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. विशेष म्हणजे फक्त दहावी उत्तीर्ण उमेदवारांपासून ते पदवीधर उमेदवारांपर्यंत भरती प्रक्रियेत अर्ज करू शकतात. त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची गरज आहे.
अर्ज स्वीकारण्यास 22 डिसेंबर पासून सुरुवात झालेली आहे तर अर्ज करण्याची अंतिम मुदत 14 जानेवारी 2024 रात्री 11.59 पर्यंतच आहे. इच्छुकांना या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या कोणत्याही कोणत्याही भागातून मुदतीआधीच सर्व अर्जदारांनी आपले अर्ज दाखल करणे आवश्यक आहे.
कोणत्या पदांसाठी किती जागा ?
ही भरतीची प्रक्रिया लातूर महानगरपालिकेतील एकूण 80 रिक्त जागांसाठी पार पडत आहे. यामध्ये खालील प्रमाणे रिक्त जागा आहेत.
पर्यावरण संवर्धन अधिकारी : 1, 2) सिस्टीम मॅनेजर ई-प्रशासन : 1, 3) मनपा वैद्यकीय अधीक्षक : 1, 4) शाखा अभियंता : 2, 5) विधी अधिकारी : 1, 6) अग्निशमन केंद्र अधिकारी : 1, 7) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) : 4, 8) कनिष्ठ अभियंता (पा/पु) : 4, 9) कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) : 1, 10) कर अधीक्षक : 2, 11) औषधनिर्माता (फार्मसिस्ट) : 1, 12) सहाय्यक कर अधीक्षक : 4, 13) कर निरीक्षक : 4, 14) चालक यंत्रचालक : 9, 15) लिपिक टंकलेखक : 10, 16) फायरमॅन : 30, 17) व्हॉलमॅन : 4
कोण अर्ज करू शकतो..
इच्छुक उमेदवारांसाठी शैक्षणिक अहर्ता ही दहावीपासून ते पदवीपर्यंत उत्तीर्ण किंवा डिप्लोमाधारक असणे आवश्यक आहे. तसेच इच्छुक उमेदवार हा भारतीय नागरिक असायला हवा. त्याचबरोबर आपली सर्व आवश्यक कागदपत्रे उमेदवारांनी अर्जासोबत ऑनलाईन अपलोड करायची आहेत.
वयाची अट: 14 जानेवारी 2024 रोजी,18 ते 38 वर्षे
अर्ज शुल्क: खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय: ₹900/-]
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 जानेवारी 2024 (11:59 PM)
Discussion about this post