संगमनेर । राज्याच्या एसटी महामंडळाच्या बसला होणाऱ्या अपघाताचे सत्र सुरुच असून अशातच संगमनेरमधून भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. एसटी महामंडळाच्या बसचा भीषण अपघात झाला असून बस जागीच पलटी झाली. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला आहे. सुदैवानं या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र काही विद्यार्थी हे जखमी झाले आहेत. जखमी विद्यार्थ्यांवर प्राथमिक उपचार करण्यात आलेत.
या बसमध्ये साधारण चाळीस विद्यार्थ्यांसह काही नागरीक प्रवास करत होते, सुदैवानं मोठी दुर्घटना टळली आहे. या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. मात्र काही जण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना स्थानिकांच्या मदतीनं तातडीनं उपचारासाठी संगमनेर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पालकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहान पोलिसांच्या वतीनं करण्यात आलं आहे.
Discussion about this post