मुंबई । राज्यात आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा सुरु असताना प्रकाश आंबेडकरांनी नवा फॉर्म्युला मांडला आहे. या नव्या जागावाटपाच्या फॉर्म्युल्यामुळे महाविकास आघाडीचं टेन्शन वाढलं आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं की, वंचित बहुजन आघाडी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत असणार, असं अगोदरच ठरलं आहे, तसं आम्ही जाहीर देखील केलं आहे. आम्ही असं ठरवलं होतं किंवा दोघांमध्ये ठरलं होतं की शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीची झाली नाही तर आम्ही 50-50 टक्के जागा लढू.
म्हणजेच 48 मधील 24- 24 जागा लढण्याचं मोघम अंडरस्टॅंडिंग आमच्यामध्ये झालं होतं, असा खुलासा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. महाविकास आघाडीतील फॉर्म्युल्यावर एकमत झालं नाहीतर आम्ही सर्व 48 जागा लढवू, असंही देखील प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं
महाविकास आघाडीचा जागेचा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा आहे. वंचितला दोन जागा सोडण्यात येणार आहे, अशी चर्चा आहे. मात्र याबाबत माझ्याशी कोणतीही चर्चा अजूनपर्यंत झालेली नाही. महाविकास आघाडीचा फॉर्म्युला कुठून आला मला याबाबत माहित नाही, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
जागावाटपाचा फॉर्म्युला
लोकसभेच्या ४८ जागांपैकी ठाकरे गट २० जागांवर निडवणूक लढणार असल्याची माहिती समोर येत आहे.काँग्रेसच्या वाट्याला १६ जागा येत आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस १० जागांवर निवडणूक लढणार आहे. महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा समावेश झाल्याने २ जागा त्यांना दिल्या जाणार आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
Discussion about this post