बुलढाणा | धुमधडाक्यात, थाटामाटात लग्न सोहळा पार पडावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र या सर्व गोष्टीला फाटा देत बुलढाण्यामधील जोडप्याने थेट संविधानाची शपथ घेऊन लग्नगाठ बांधली आहे. या लग्नसोहळ्याचा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. शुभांगी आणि सुमित असे या विवाहित जोडप्याचे नाव आहे.
लग्न म्हटलं की डीजे, घोडा, फटाके आलेच. अलिकडच्या काळात तर प्री वेडिंग शूट च फॅड आलय.. ह्या सर्व गोष्टी आपल्या लग्नात व्हाव्या अशी सर्वच वधू वरांची अपेक्षा असते, परंतू यासोबतच आपण भारतीय या नात्याने भारतीय संविधानाचा आदर करत भारतीय संविधानाची शपथ घेऊन बुलढाण्यात वधू वरांनी प्रास्ताविकेचे वाचन करून आपली रेशीमगाठ बांधली आहे.
पत्रकार सिद्धार्थ आराख यांची कन्या शुभांगी हिचा विवाह सुंदरखेड येथील सुमित अंभोरे यांच्यासोबत संपन्न झाला. यावेळी वधु- वराने भारतीय संविधानाची शपथ घेऊन सात फेरे घेतले. यावेळी माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ आणि कुणाल गायकवाड यांच्याहस्ते वधू वरांना भारताच्या संविधानाची प्रत देण्यात आली. आणि आमदार संजय गायकवाड, पुरुषोत्तम खेडेकर यांच्यासह जन समुदायाच्या उपस्थितीत वधू वरांनी संविधान प्रास्ताविकेचे वाचन केले आणि त्यानंतर इतर धार्मिक विधी नुसार हा आगळावेगळा विवाह पार पडला..
Discussion about this post