१०वी उत्तीर्ण आहात आणि तुम्हाला बँकेत नोकरी करायची असेल तर सेंट्रल बँक ऑफ इंडिया (CBI) मध्ये चांगली संधी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाने भरतीची जाहिरात काढली आहे. बँकेने सब स्टाफ अर्थात सफाई कर्मचारी या पदांसाठी ही भरती आयोजित केली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले जात आहे.
अर्ज करण्यास इच्छिणारा कोणताही उमेदवार Centralbankofindia.co.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची अंतिम मुदत ९ जानेवारी २०२४ किंवा त्यापूर्वी. या भरतीद्वारे एकूण ४८४ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. तुम्हालाही या पदासाठी अर्ज करून नोकरी मिळवायची असेल, तर खाली दिलेल्या या गोष्टी काळजीपूर्वक वाचा.
पदाचे नाव : सब स्टाफ अर्थात सफाई कर्मचारी
आवश्यक पात्रता :
अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून दहावी किंवा त्याच्या समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. याशिवाय स्थानिक भाषेचेही ज्ञान असले पाहिजे.
वयोमर्यादा किती असेल?
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा ३१ मार्च २०२३ रोजी १८ ते २६ वर्षे दरम्यान असावी. याशिवाय सरकारी नियमांनुसार वयातही सवलत दिली जाणार आहे.
अर्जाची फी
अर्जाची फी उमेदवारांच्या श्रेणीनुसार बदलते. SC/ST/PWBD/महिला उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून १७५ रुपये (जीएसटीसह) भरावे लागतील तर इतर सर्व उमेदवारांना ८५० रुपये (जीएसटीसह) भरावे लागतील.
Discussion about this post