मुंबई : यंदाच्या मान्सूनवर अलनिनोचा प्रभाव राहणार असल्याचे सांगितलं जात आहे. त्यामुळे यंदा नेमका किती पाऊस पडेल याची चिंता प्रत्येकाला सतावत आहे. भारतीय हवामान विभागाचा मान्सून संदर्भात दुसरा अंदाज जाहीर केला असून जून ते सप्टेंबर दरम्यान मान्सून सरासरी 96 टक्के संपूर्ण देशात कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.
दरवर्षी शेतकऱ्यांना भारतीय हवामान विभागाच्या अंदाजाची प्रतीक्षा असते. सगळे शेतकरी नेमका हवामान विभागाचा काय अंदाज येईल याची वाट बघत असतात. यंदाच्या हंगामात सरासरीच्या 96 टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. मान्सूनमध्ये अल निनोचा प्रभाव बघायला मिळण्याची दाट शक्यता असल्याचे देखील भारतीय हवामान विभागाची म्हटले आहे. हवामान विभागाकडून (IMD) तिसरा अंदाज हा जुलै महिन्यात जाहीर करण्यात येणार आहे.
दरम्यान, देशातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासा देणारी बातमी असली तरी महाराष्ट्रात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे.
Discussion about this post