भारतीय हवाई दलात काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय हवाई दलाने काही रिक्त पदांसाठी भरती काढली असून त्याकरिता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. एकूण २७६ जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जून २०२३ असून भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण आणि महत्वाच्या तारखा याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
पदाचे नाव – कमीशंड ऑफिसर
शैक्षणिक अर्हता
AFCAT एंट्री- फ्लाइंग – ५० टक्के गुणांसह फिजिक्स व गणित विषयांसह १२ वी पास + ६० टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/ B.E/ B.Tech.
AFCAT एंट्री – ग्राउंड ड्युटी (टेक्निकल) – ५० टक्के गुणांसह फिजिक्स व गणित विषयांसह १२ वी उत्तीर्ण + ६० टक्के गुणांसह B.E/ B.Tech.
AFCAT एंट्री – (नॉन टेक्निकल) – ६० टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/ B.Com/ ६० टक्के गुणांसह BBA/ BMS/ BBS/ CA/ CMA/ CS/ CFA. किंवा B.Sc (फायनान्स).
NCC स्पेशल एंट्री फ्लाइंग – NCC एअर विंग सिनिअर डिव्हिजन C प्रमाणपत्र.
अर्ज शुल्क –
AFCAT एंट्री – 250 रुपये.
NCC स्पेशल एंट्री आणि मेट्रोलॉजी एंट्री – फी नाही.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० जून २०२३
Online अर्ज: Apply Online [Starting: 01 जून 2023]
Discussion about this post