चीनच्या उत्तर भागात बसलेल्या भूकंपाच्या भीषण धक्क्यामुळे हाहाकार माजला आहे. चीनच्या गान्सू आणि किंघई प्रांतात सोमवारी रात्री उशीरा भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. या भूकंपामुळे शेकडो लोकांचा मृत्यू झाला असून अनेक नागरिक जखमी झालेत. या भूकंपात अनेक घरे उद्धवस्त झाली आहेत. तसेच खूप जास्त नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, चीनमधल्या लिंक्सिया येथील जिशिशन काउंटीमध्ये ६.२ तीव्रतेचा धक्का बसला असून हा संपूर्ण थरारक अनूभव सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. चीनमधील गांसू प्रांतात १०५ जण ठार तर ४०० जण जखमी झाले आहेत, असे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तर किंघाई प्रांतातील हैदोंग शहरात ११ जणांचा मृत्यू तर १०० जण जखमी झाले आहेत.
CCTV footage captured the moment when a 6.2 magnitude earthquake hit Jishishan county, Linxia, Gansu Province, China on Monday midnight. According to Xinhua, more than 110 people have died in the quake. All-out rescue work is underway. pic.twitter.com/d0M2ETJQ7S
— Global Times (@globaltimesnews) December 19, 2023
भूकंपाचा हा संपूर्ण थरारक अनुभव सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. ग्लोबल टाईम्सने हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत संपूर्ण जमीन हादरताना दिसत आहे. इमारतीचा काही भाग कोसळत आहे. तसेच अनेक लोक जीव वाचवण्यासाठी दुकाने आणि ऑफिसमधून बाहेर पडताना दिसत आहे. यामुळे नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसत आहे. या भूकंपात अनेक घरे उद्धवस्त झाली आहेत. तसेच खूप जास्त नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.
https://twitter.com/MehrGulFraz/status/1736981694492889590
एका रिपोर्टनुसार, या भूकंपाची तीव्रता ६.२ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. तर त्याची खोली अंदाजे १० किलोमीटर इतकी होती. भूकंपामुळे चीनच्या गांसू-किंघाई सीमावर्ती भागातील अनेक इमारती कोसळल्या आहेत. याठिकाणी मृतांची संख्या देखील जास्त आहे. आतापर्यंत जवळपास २०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.















Discussion about this post