जालना | गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत असून अशातच किरकोळ कौटुंबीक वादातून मुलाने जन्मदात्या बापाला संपविले. ही धक्कादायक घटना जालना शहरातील गांधीनगर भागात घडली. इब्राहीम खान मुबारक खान (वय 60 वर्ष, रा. अक्सा मशीद परिसर) असे मयत व्यक्तीचे नाव असून, शाहरुख इब्राहीम खान (वय 30 वर्ष) असे संशयित आरोपी मुलाचे नाव आहे.या घटनेने परिसरात मोठी खळबल उडाली.
अधिक माहितीनुसार, किरकोळ कौटुंबीक वादातून मुलाने बापाचा डोक्यात लाकडी दाड्यांने जबर मारहाण करून खून केल्याची घटना समोर आली आहे. जालना शहरातील गांधीनगर भागात सोमवारी दुपारी हा प्रकार उघडकीस आला आहे. इब्राहीम खान मुबारक खान असे मृताचे नाव असून, या प्रकरणी पोलिसांनी मुलगा शाहरुख इब्राहीम खान यास ताब्यात घेतले आहे.
या घटनेविषयी पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रिक्षाचालक असलेला शाहरुख इब्राहीम खान हा वडील इब्राहीम खान यांना राहते घर विकण्यास सांगत होता. मात्र, वडिलांचा यास विरोध होता. यातून बाप-लेकांमध्ये नेहमी वाद व्हायचे. आज दुपारी याच कारणावरून झालेल्या वादातून शाहरुख खान याने वडील इब्राहीम खान यांच्या डोक्यात लाकडी दांड्याने वार करून जखमी केले. त्यामुळे रक्तबंबाळ होऊन ते बेशुद्ध पडले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
इब्राहीम खान हे जालना शहरातील गांधीनगर भागात राहतात. त्यांचा मुलगा शाहरुख रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. दरम्यान, मागील काही दिवसांपासून गांधीनगरमधील राहते घर विकण्याचा आग्रह शाहरुखने धरला होता. मात्र, घर विकायच्या भूमिकेवर इब्राहीम खान यांनी स्पष्टपणे नकार दिला होता. त्यामुळे गेल्या काही दिवसांत याच कारणावरून बाप-लेकांमध्ये नेहमी वाद होत असल्याचे पाहायला मिळायचे. दरम्यान, सोमवारी पुन्हा वाद झाले आणि वाद एवढ्या विकोपाला गेले की, शाहरुखने रागाच्या भरात वडिलांच्या डोक्यात लाकडी दाड्यांने जबर मारहाण केली. याच मारहाणीत त्यांचा जागीच मृत्यू झाला.















Discussion about this post