पाचोरा । पाचोरा तालुक्यातील वाणेगाव येथील अल्पवयीन मुलीला गावातीलच तरुणाने घरात बोलावून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत ३१ वर्षीय युवकावर पिंपळगाव हरेश्वर पोलिसात ‘पोस्को’ अंतर्गत गुन्हा दाखल झाला त्याला अटक करण्यात आली आहे.
अल्पवयीन मुलगी अंगणात खेळत असताना अमोल नामक युवकाने आईस्क्रीम देण्याच्या बहाण्याने तिला घरात बोलवले. तिच्या अंगावरून हात फिरवत तिचे कपडे काढण्याचा प्रयत्न केला असता, तिने आरडाओरड केली. तेव्हा त्याने ‘कोणाला सांगितले तर तुझे तुकडे करून फेकून देईन’ असा दम देऊन सोडून दिले. अशी तक्रार पीडीत मुलीच्या वडिलांनी पोलिसात दिल्यावरून पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी ‘पोस्को’ अंतर्गत गुन्हा नोंदवून अमोल नामक युवकाला अटक केली आहे.
त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक महेंद्र वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमोल पवार करीत आहेत.
Discussion about this post