जळगाव । राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी भाजपचे मंत्री गिरीश महाजनांवर पुन्हा हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी मंत्री गिरीश महाजनांची एसआयटी चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली. कारण दाऊद इब्राहिमचा साथीदार सलीम कूत्ता यांच्या कार्यक्रमात उपस्थित राहिल्याबद्दल मंत्री गिरीश महाजन एसआयटी चौकशीची मागणी खडसेंनी केली.
खडसे म्हणाले, दाऊद इब्राहिमच्या बायकोबरोबर माझे संभाषण झाले. अश्या स्वरूपाचा आक्षेप माझ्यावर लावण्यात आला होता.त्यावेळी माझी चौकशी लावण्यात आली, चौकशीत कोणतेही तथ्य नसल्याचे समोर आले कारण त्या ठिकाणी कोणताही पुरावा नव्हता.
परंतू आता दाऊदचा साथीदार सलीम कुत्ता यांच्या बरोबर त्या पार्टीत गिरिश महाजन असल्याचा पुरावाच समोर आला आहे. त्यांच्या सोबत महाजन यांचे फोटोच प्रसिद्ध झाले आहेत. देशद्रोही व्यक्ती बरोबर संबंध असल्याचा आरोप तुम्ही सुधाकर बडगुजर यांच्यावर करता आहात त्याची चौकशी करण्यासाठी एसआयटी नेमली जाते आहे.
मग राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या बरोबर सलीम कुता याच्याबरोबर फोटो दिसतो आहे. ते पार्टीत उपस्थीत असल्याचे फोटोतून स्पष्ट झाले आहे, त्यामुळे गिरीश महाजन यांचे देशद्रोही यांच्या सोबत संबंध आहेत काय ? याची चोकशी झाली पाहिजे अशी आपली मागणी असल्याचे खडसे म्हणले.
Discussion about this post